वैभवकुमार लोहगावकर यांचे तहसीलदारांना निवेदन; महसूल विभागातील कारभारावर उपस्थित केले प्रश्न
बिलोली : प्रतिनिधी
बिलोली तालुक्यातील लोहगाव मंडळ कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत अंबेराय यांच्या कार्यपद्धतीची उच्चस्तरीय, स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैभवकुमार किशनराव लोहगावकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी बिलोलीचे तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
लोहगाव मंडळातील महसूल प्रशासनाच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये शंका, तक्रारी व अडचणी निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून प्रशासकीय जबाबदारी निश्चित करावी, तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये पारदर्शकता आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण भागातील जनतेशी थेट संबंधित विभाग आहे. त्यामुळे अशा महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी शासनाचे नियम, कायदे आणि प्रशासकीय शिस्त यांचे काटेकोर पालन करणे अपेक्षित आहे. मात्र, लोहगाव मंडळातील कामकाजाबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका व तक्रारींची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची, प्रशासकीय जबाबदारीची, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची तसेच महसूलविषयक प्रकरणांच्या निकाली काढण्याच्या प्रक्रियेची सखोल चौकशी करावी. चौकशीत दोष आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी, संबंधित अधिकाऱ्यांची बदली करून त्यांच्या जागी नवीन कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व कार्यक्षम मंडळ अधिकारी नियुक्त करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूलमंत्री, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव, छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त, नांदेड जिल्हाधिकारी व संबंधित उपविभागीय अधिकारी यांनाही माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
आता या निवेदनाची महसूल प्रशासन कितपत गांभीर्याने दखल घेते आणि संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून काय कारवाई करते, याकडे लोहगाव परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.केले प्रश्नबिलोली : प्रतिनिधीबिलोली तालुक्यातील लोहगाव मंडळ कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत अंबेराय यांच्या कार्यपद्धतीची उच्चस्तरीय, स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैभवकुमार किशनराव लोहगावकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी बिलोलीचे तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.लोहगाव मंडळातील महसूल प्रशासनाच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये शंका, तक्रारी व अडचणी निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून प्रशासकीय जबाबदारी निश्चित करावी, तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये पारदर्शकता आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण भागातील जनतेशी थेट संबंधित विभाग आहे. त्यामुळे अशा महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी शासनाचे नियम, कायदे आणि प्रशासकीय शिस्त यांचे काटेकोर पालन करणे अपेक्षित आहे. मात्र, लोहगाव मंडळातील कामकाजाबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका व तक्रारींची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची, प्रशासकीय जबाबदारीची, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची तसेच महसूलविषयक प्रकरणांच्या निकाली काढण्याच्या प्रक्रियेची सखोल चौकशी करावी. चौकशीत दोष आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी, संबंधित अधिकाऱ्यांची बदली करून त्यांच्या जागी नवीन कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व कार्यक्षम मंडळ अधिकारी नियुक्त करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूलमंत्री, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव, छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त, नांदेड जिल्हाधिकारी व संबंधित उपविभागीय अधिकारी यांनाही माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.आता या निवेदनाची महसूल प्रशासन कितपत गांभीर्याने दखल घेते आणि संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून काय कारवाई करते, याकडे लोहगाव परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.











